शिंकताना आपले डोळे बंद होतात, ही बाब तुमच्या निदर्शनास आली असेलच. पण, शिंकताना डोळे का बंद होतात, हे तुम्हाला माहितीय?
शिंकताना आपलं शरीर अशाप्रकारे का प्रतिसाद असा विचार तुम्ही कधी केला आहे का?
जेव्हा आपल्या नाकात धूर, धुळीचे कण किंवा इतर कोणते कण प्रवेश करतात, तेव्हा ते बाहेर काढण्साठी मेंदु आपल्याला संकेत देतो, यामुळे शिंका येतात.
शिंकताना आपले डोळे बंद होतात, जीभ वर उचलली जाते आणि शरीराचे स्नायूही आकुंचन पावतात. ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते.
जेव्हा धूळ किंवा परागकण या थराला स्पर्श करतात तेव्हा पेशी उत्तेजित होतात आणि मेंदूला सिग्नल पाठवतात. मग मेंदू आपल्या शरीराला शिंकण्यासाठी आणि त्रासदायक पदार्थ बाहेर टाकण्याचा आदेश देतो.
शिंकताना डोळे बंद करणे, ही एक सामान्य गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आपला मेंदू आपले डोळे बंद करण्याचा संदेश पाठवतो.
ही एक अनैच्छिक क्रिया आहे, म्हणजेच आपण आपल्या इच्छेने त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी शिंकताना डोळे उघडे ठेवणे जवळजवळ अशक्य आहे.