अंडी हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे, त्यामुळे शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासोबतच हाडांचं आरोग्य उत्तम राहण्यासही मदत होते.
अंड्यांमध्ये असलेलं व्हिटॅमिन D शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण करतं. ज्यामुळे हाडं आणि दातांचं आरोग्य उत्तम राहतं.
प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असणारं अंड फूल फिलिंग नाश्ता समजलं जातं. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळतेच, पण कधीही लागणारी भूकही कमी होते आणि पोट बराच काळ भरलेलं राहातं. ज्यामुळे वजन कमी होतं.
अंड्यांमध्ये कोलीन असतं, जे ब्रेन फंक्शन्स आणि मेमरी शार्प करण्यासाठी मदत करतं.
रिसर्चनुसार, गरोदर स्त्रियांनी अंड्याचं सेवन केल्यानं बाळाच्या मेंदूचा विकास उत्तम पद्धतीनं होण्यास मदत होते.
मर्यादेत अंड्याचं सेवन केल्यानं हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते
अंड्यामध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट ल्यूटिन डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं.
दररोज दोन अंडी खाल्यानं शरीराला बळकटी मिळते. तसेच, रोगप्रतिकार शक्ती वाढते.
अंड व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन B12, बायोटिन, रिबोफ्लाविन, थियामिन आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात असतं, हे सर्व व्हिटॅमिन्स त्वचा आणि केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात.