त्यामुळे हिवाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घ्या.
थंडीचा मज्जासंस्थेवर खोलवर परिणाम होतो, ज्यामुळे मल्टिपल स्क्लेरोसिस (MS), पार्किन्सन्स, मायग्रेन आणि न्यूरोपॅथी यासारख्या रुग्णांची लक्षणे बिघडू शकतात.
या आजारांनी ग्रस्त रूग्णांनी थंडीच्या काळात या परिणामांना सामोरं कसं जावं, हे वाचा.
मल्टिपल स्क्लेरोसिस ग्रस्त रूग्णांसाठी, थंड हवामानामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि ताठरता वाढू शकतो, ज्यामुळे चालणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होते.
थंडीमुळे रक्ताभिसरण देखील मंदावते, ज्यामुळे बधीरपणा आणि मुंग्या येणे यासारखी लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.
थंड हवामानात शरीराच्या तापमानाचे नियंत्रित करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो, त्यामुळे अस्वस्थता आणखी वाढते.
मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांसाठी, हिवाळ्यात अनेकदा डोकेदुखीची समस्या वाढू शकते. तापमानात अचानक बदल, थंड वारा आणि हीटरचा वापर यामुळे मेंदूमध्ये रक्तवहिन्यासंबंधी बदल होतात, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
थंडीमुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे सीझनल ऍफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) ची समस्या वाढू शकते, हे एक प्रकारचे नैराश्य आहे.
हात-पायांच्या नसांवर परिणाम करणारा परिधीय न्यूरोपॅथी ही समस्या थंडीच्या मोसमात वाढते. थंड तापमानात रक्त प्रवाह मंदावतो, ज्यामुळे वेदना, सुन्नपणा आणि संवेदनशीलता वाढते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.