मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, प्रोटीन, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, सेलेनियम, कॉपर, व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन बी 3 सारखे पोषक घटक आढळतात.
त्यात खूप कमी कॅलरीज देखील असतात. अशा परिस्थितीत मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांना ते नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो.
नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार, दररोज 5 बटन मशरूमचे सेवन केल्याने कर्करोग, स्मृतिभ्रंश आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अमेरिकास्थित पेन स्टेट सेंटर फॉर प्लांट अँड मशरूम प्रॉडक्ट्स फॉर हेल्थचे संचालक प्रोफेसर रॉबर्ट बीलमन यांनी सांगितलं की, अभ्यासामध्ये आढळलं की मशरूम हे अँटिऑक्सिडंट्सचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत.
यामधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला वृद्धत्वाच्या प्रक्रियेपासून आणि अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.