दह्यासोबत खाऊ नयेत हे 5 पदार्थ

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

कांदे आणि दही

कांदे गरम आणि तिखट असतात, तर दही थंड आणि आंबट. एकत्रित खाल्ल्यास शरीराच्या उर्जेमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते.

Image Source: Unsplash

दही आणि उडीद डाळ

उडीदची डाळ दाट असते. दह्यासोबत मिसळल्यास आणखी जड वाटू शकते आणि पचनक्रिया मंदावते.

Image Source: Google

दही आणि आंबट फळे

दही आणि फळांमध्ये चव आणि पचनाच्या बाबतीत परस्परविरोधी गुण असतात. ते एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया विस्कळित होऊ शकते.

Image Source: Unsplash

दुधासह दही

दही आणि दुधाच्या एकत्र सेवनाने अपचन, पोटफुगी किंवा गॅस होऊ शकतो.

Image Source: Unsplash

मासे आणि दही

दह्याचे थंडावा देणारे स्वरूप आणि माशांचे उष्णता निर्माण करणारे स्वरूप एकत्र सेवन केल्यास पचनक्रियेत असंतुलन निर्माण होऊ शकते.

Image Source: Unsplash