अनेकदा आपण जेवण गरम करण्यासाठी मायक्रोव्हेवचा वापर करतो.
तज्ज्ञांच्या मते, ओव्हनमध्ये जेवण गरम करुन खाणं चुकीचं आहे. यामुळे अन्नातील पोषकतत्त्वं कमी होतात.
ओव्हनमध्ये जेवण गरम करणं योग्य असो किंवा अयोग्य, मात्र काही भांड्यामध्ये जेवण गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
बहुतेक लोक प्लॅस्टिकची भांडी, जेवणाचा डबा ओव्हनमध्ये ठेवून अन्न गरम करतात. हे खूप हानिकारक असू शकते.
एका अभ्यासानुसार, प्लास्टिकमध्ये जेवण गरम केल्याने त्यामध्ये असलेले काही हानिकारक रसायने अन्न गरम करताना त्यात प्रवेश करू शकतात.
प्लास्टिकमधील ही रसायने आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
काही लोक नकळत स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्येही अन्न गरम करायला लागतात. त्यामुळे ठिणगी, स्फोट किंवा आग लागण्याचा धोका असतो.
धातूची भांडी विजेचे उत्तम वाहक असतात. त्यामुळे ही भांडी लवकर गरम होतात आणि स्फोट होऊ शकतो. ओव्हनमध्ये धातूची भांडी वापरु नये.
काही लोक चपाती, पराठे किंवा भाज्या ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ओव्हनमध्ये ठेवतात.
ओव्हनमध्ये ॲल्युमिनियम फॉइल ठेवल्याने स्फोट होऊन आज लागण्याचा धोका संभवतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.