तुम्हाला माहितीय का? शरीरातलं कमी झालेलं रक्त झटपट वाढवणारं फळ कोणतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजकालच्या अनियमित जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवत आहे.

Image Source: pexels

या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या येतात, त्यापैकी एक म्हणजे रक्ताची कमतरता.

Image Source: pexels

वैद्यकीय भाषेत, शरीरातील रक्ताच्या कमतरतेला 'ॲनिमिया' म्हणतात.

Image Source: pexels

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि शरीरात रक्त वाढवण्यासाठी योग्य आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार सर्वात आवश्यक आहे.

Image Source: pexels

तुम्हाला माहितीय का? शरीरात सर्वाधिक वेगानं रक्त वाढवणारं फळ कोणतं आहे.

Image Source: pexels

तुमच्या शरीरातलं रक्त कमी झालं असेल आणि वाढवायचं असेल, तर डाळिंब खा...

Image Source: pexels

डाळिंबामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, पॉलिफेनॉल आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर असतात.

Image Source: pexels

डाळिंबामध्ये असलेले लोह शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतं.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, डाळिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी इतर पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करतं.

Image Source: pexels

डाळिंबामध्ये असलेले आयर्न हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यात मदत करतं.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.