हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? हिवाळ्यात त्वचा रुक्ष होते. थंड वातावरणामुळे त्वचेतील ओलावा निघुन जाऊन त्वचा कोरडी होते यापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करु शकता. हिवाळ्यात त्वचेचा खास काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही हिवाळ्यात त्वचेवर औषधी गुणधर्मांनी युक्त एलोवेरा जेल लावण्यास सुरुवात करु शकता. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. एलोवेरा जेलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात आणि यामधील माइस्चरायजिंग गुणांमुळे स्किन ड्राय होण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. हिवाळ्यात तुम्ही त्वचेवर नारळाच्या तेलाचाही वापर करु शकता, हे फायदेशीर ठरेल. कोकोनट ऑईलमुळे तुमच्यी त्वचा हिवाळ्यात मुलायम राहण्यास मदत होईल. तुम्ही हिवाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये गुलाब जल वापरु शकता. गुलाब जलमधील विविध पोषकतत्व हिवाळ्यात तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यात मदत करतील. मधाचा वापरही तुम्ही स्किन केअरसाठी करु शकता. मध वापरल्याने त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होईल. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.