दहीमध्ये अधिक प्रमाणात पोषक घटक असतात आणि ह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी-2, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारख्या गोष्टी शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात.
दही खाल्ल्याने शरीराचे हाडे मजबूत राहतात आणि अॅसिडिटी गॅसपासून मुक्त होण्यास मदत करते.
ज्या व्यक्तीला पचन क्रियेचा त्रास असेल त्यांना दही खूप फायदेशीर राहील.
दही खाल्ल्याने मेंदूमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो ऍसिड सोडते, मेंदूच्या कार्याला गती मदत करते.
दहीमध्ये प्रोटिन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
दहीमध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड हे चेहऱ्यावरचा तेलकटपणा आणि काळवटपणा कमी होण्यास मदत होते आणि चेहर्यावर चमकदारपणा येतो.
दहीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे दातांना मजबूत ठेवण्यास मदत होते.