आजकाल अनेक लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत, ज्यामुळे लहान वयातच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
रक्तदाब वेळेवर मोजला नाही तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो.अनेकांना त्यांच्या वयानुसार योग्य BP काय असावे हे माहितीही नसते.
रक्तदाब जर 120/80 mm Hg पेक्षा कमी असेल, तर तो सामान्य मानला जातो.या श्रेणीबाहेर गेल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
जर BP 130–139/80–89 mm Hg दरम्यान असेल, तर हायपरटेन्शनचा पहिला टप्पा सुरू होतो.
या टप्प्यावर नियंत्रण घेतल्यास गंभीर त्रास टाळता येतो.
जर BP 180/120 mm Hg पेक्षा जास्त असेल, तर ही एक आपत्कालीन स्थिती असते.
हृदयविकाराचा धोका वाढतो, आणि त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
पुरुष व स्त्रियांमध्ये वयानुसार रक्तदाबाचे प्रमाण वेगळे असते.
सर्वांसाठी एकसारखा BP नसतो.
नवजात बाळांचे BP 60–90/20–60 mm Hg असावे.हे योग्य रक्तप्रवाह आणि शरीरविकासासाठी आवश्यक आहे.
१ महिन्यानंतर मुलांचे BP 95–105/53–66 आणि नर्सरी वयात 95–110/56–70 mm Hg असावे.
वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर याची नियमित तपासणी महत्त्वाची आहे.
शालेय वयातील मुलांचे BP 97–112/57–71 mm Hg असावे.योग्य आहार आणि सवयींमुळे BP नियंत्रणात राहतो.
किशोरवयीन मुलांचे BP 112–128/66–80 mm Hg असावे.शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.
१८ ते ३९ वयोगटातील स्त्रियांचे BP सुमारे 110/68 mm Hg असावे, तर पुरुषांचे 119/70 mm Hg.आज अनेक तरुण यापासून दूर गेलेले दिसतात.
४० ते ५९ वयोगटातील स्त्रियांचे BP 122/74 mm Hg आणि पुरुषांचे 124/77 mm Hg असावे.या वयानंतर नियमित आरोग्य तपासणी आवश्यक ठरते.