झोपण्यापूर्वी 'अभ्यंग' म्हणजे आयुर्वेदिक तेल मालिश होय. तुमच्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करणे हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही मालिश मज्जासंस्थेला शांतता देते, रक्ताभिसरण सुधारते आणि दिवसभराचा ताण हलका करत मनाला विश्रांती मिळवून देते.
तुमच्या पावसाळ्यातील रात्रीच्या दिनचर्येत कडुलिंब किंवा तुळशीच्या पाण्याने गरम आंघोळ करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. या औषधी वनस्पतींमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे त्वचेला संसर्गापासून वाचवू शकतात.
पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेमुळे त्वचेची छिद्रं बंद होऊ शकतात, ज्यामुळे ब्रेकआउट्सचा त्रास वाढू शकतो. अशा वेळी सौम्य वाफ घेण्याचा उपाय (स्टीम सेशन) त्वचेतील मळ व अतिरिक्त तेल सैल करून बाहेर टाकण्यास मदत करतो. तसेच, त्वचेच्या डिटॉक्सिफिकेशनला चालना देतो. हा उपाय केवळ त्वचेला ताजेतवाने करत नाही, तर झोपण्यापूर्वी मनालाही शांततेचा अनुभव देतो.
सुगंध चिकित्सा ही मनाला शांत करणारी एक प्रभावी पद्धत आहे, जी मानसिक ताण कमी करण्यात मदत करू शकते. लैव्हेंडर, नीलगिरी किंवा कॅमोमाइल यांसारखे तेल तणाव कमी करण्यास मदत करतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.
गरम हर्बल पेयामध्ये कॅमोमाइल, तुळस किंवा आले यांसारखे घटक असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास, मज्जातंतूंना शांत करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हे पेय शरीराला आराम देतात. मौसमी सर्दी व इतर संसर्गांपासून संरक्षण करण्यास ते पेय उपयुक्त ठरतात.
पावसाळ्यात रात्रीच्या दिनचर्येत मिठाच्या गरम पाण्यात पाय भिजवणे ही एक अत्यंत आरामदायी आणि लाभदायक प्रक्रिया ठरू शकते. यामुळे थकलेल्या पायांना विश्रांती मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
सुकलेल्या तेजपत्त्यांची पाने जाळल्याने घरात शांत आणि आरामदायक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. यामधून निर्माण होणारा सौम्य, नैसर्गिक सुगंध तणाव आणि चिंता कमी करतो, तसेच मनःशांती मिळवून चांगली झोप येण्यासही मदत करतो.
पावसाळ्यात कपाळावर हर्बल बाम लावल्याने डोकेदुखी आणि तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मन शांत होते, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला आराम मिळतो.
स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मनाला शांतता मिळते, ज्यामुळे झोप येणे सोपे होते.
कोमट पाण्यात चिमूटभर खडे मीठ घालून पिणे, हा पावसाळ्यात होणाऱ्या अपचनाला कमी करण्यासाठी एक पारंपरिक उपाय आहे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि एकंदरीत आरोग्य सुधारण्यासही लाभदायक ठरते.