ओल्या केसांची मुळे कमकुवत असतात, त्यामुळे ओले केस सहज तुटतात.
ओले केस नाजूक असतात, म्हणू्न त्यांना जास्त काळजीची गरज असते.
त्यामुळे ओल्या केसांची जास्त काळजी घ्यावी लागते.
जर केस वेळेवर सुकले नाहीत तर, वास येण्याची आणि जंतू वाढण्याची दाट शक्यता असते.
ओल्या केसांमुळे थंडावा निर्माण होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो.
ओल्या केसांवर स्ट्रेटनरसारखे हीट टूल्स वापरणे टाळा.
ओल्या केसांवर स्ट्रेटनर आणि कर्लसच्या वापराने केस तुटण्याची शक्यता जास्त असते.
केस ओले राहिले तर टाळूला फंगल आणि बॅक्टेरियासारखे जंतू संसर्ग संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
बुरशी संसर्गामुळे कोंडा आणि स्कॅल्प इंन्फेक्शनची समस्या उद्भवते.
जास्त वेळ केस ओले राहिल्यास केसांची मुळे कमकुवत होतात.
त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.