थंडीच्या दिवसात गूळ, तूप, तीळ यासह अन्य उष्ण खाद्यपदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
गुळाचे सेवन केल्यास हाडे आणि स्नायू मजबूत होतात. हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
हिवाळ्यात गुळाचं सेवन फायदेशीर मानलं जातं. पण, काही जणांसाठी याचं सेवन नुकसानदायुक ठरु शकतं.
लहान मुलांच्या आहारात गुळाचा समावेश करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे चांगले मानले जाते, मात्र खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांनी सेवन करु नये.
ज्या लोकांना कफाचा त्रास आहे, त्यांनी गुळाचे सेवन करू नये कारण, त्यामुळे कफ वाढू शकतो.
काही लोक चहामध्ये साखरेऐवजी गूळ वापरतात. दूध आणि गूळ हे दोन्ही विसंगत आहेत, त्यामुळे चहामध्ये गुळाचे सेवन करू नये.
लहान मुलांनाही गूळ खूप आवडतो, पण ज्या मुलांना जंत असतात त्यांना गूळ देऊ नये.
महत्त्वाचं म्हणजे अलिकडे बाजारात भेसळयुक्त पदार्थांचं प्रमाण वाढताना दिसत आहे.
भेसळयुक्त गुळाचे सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.