थंडीच्या दिवसात हातसोबतच पायांची काळजी घेणेही गरजेचं आहे.

बदलत्या वातावरणामुळे आणि धूळीमुळे पाय फाटण्याची समस्या उद्भवते.

फुटलेल्या पायांमुळे बहुतेकवेळा आपल्याला लाज वाटते आणि आवडते फूटवेअर वापरता येत नाहीत.

जर तुम्हीही या समस्येपासून त्रस्त असाल, तर काही घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

पाय फुटण्याच्या समस्येवर तुरटी हा रामबाण उपाय आहे.

तुरटी त्वचेची झालेली झीज भरुन काढण्यात फायदेशीर आहे.

तुम्ही तुरटी घेऊन त्याची बारीक पावडर करा.

आता यामध्ये लिंबाचा रस मिसळा.

हे मिश्रण फुटलेल्या पायांवर लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवून नंतर स्क्रब करा.

यानंतर पाय स्वच्छ धुवून त्याला ग्लिसरीन किंवा चांगलं मॉईश्चरायजर लावा.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.

एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.