पण, तुम्ही कधी विचार केलाय का? यापैकी चांगलं काय?
तसं पाहायला गेलं तर, भारतात व्हिस्की, व्होडका, बियर की रम ही सर्व पेय भारतीय आवडीनं पितात.
पण, यापैकी भारतीयांचं सर्वात आवडतं पेय कोणतं? हे जाणून घेऊयात.
एका रिपोर्टनुसार, भारतात 2024 मध्ये 6.21 बिलियन लीटर दारूचं सेवन केलं जातं.
याच्या बाजारातील किमतीबाबत बोलायचं तर, 55840 मिलियन डॉलरच्या आसपास आहे.
भारतीय चलनात पाहायचं तर, 4, 63, 472 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
जर याची तुलना 2020 शी केली तर, त्यावेळी भारतातील खप हा 5 बिलियन लीटरच्या आसपास होती.
व्हिस्की भारतात सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे.
2024 च्या आकड्यांनुसार, जवळपास 60 टक्क्यांच्या आसपास भारतीयांना विस्की आवडते.
मनीकंट्रोलच्या आकड्यांनुसार, भारतात व्हिस्कीचं मार्केट 651.55 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा किंवा आवाहन करत नाही.)