असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, पण खरंच असं शक्य आहे...
यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात थोडा बदल करावा लागेल आणि काही चांगल्या सवयी अंगवळणी पाडाव्या लागतील.
पोटावरची चरबी वाढण्यासाठी अनहेल्दी लाईफस्टाईल, हेरिडीटी आणि तणाव यांसारख्या गोष्टी कारणीभूत ठरतात...
व्यायाम केल्यानं नक्कीच तुम्ही वजन कमी करू शकता, पण त्यासोबतच व्यायाम न करताही सुटलेलं पोट कमी करणं शक्य आहे...
बेली फॅट्स अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतं, जसं की, हृदयरोग, टाईप 2 डायबिटीज, कॅन्सरसोबतच स्लो मेटाबॉलिज्मही कारण ठरतं.
व्यायामाशिवाय पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्या.
प्रोटीनमुळे बराच काळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि मेटाबॉलिज्म बुस्ट होतं. तसेच, क्रेविंग्सही कमी होतात.
वजन कमी करण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणी प्या.
पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुरळीत होते, तसेच शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात.
हिवाळ्यात कमीत कमी 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा
व्यवस्थित, शांत आणि पूर्ण झोप घ्या, यामुळेही वजन नियंत्रणात राहातं.
धकाधकीच्या जीवशैलीत ताण, तणाव या समस्या तर रोजच्याच झाल्या आहेत. त्यामुळेही वजन वाढतं.
ताण, तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा... त्यामुळे वजन नियंत्रणात राहातंच, पण इतरही समस्या दूर होतात...
साखर आणि सोडा असलेल्या डिंक्सचं कमी सेवन करा, यामुळेही वजन नियंत्रणात राहातं...