हिवाळ्यात बीट आणि गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी लाभदायी ठरतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

यामुळे शरीराला विटॅमिन्स आणि इतर आवश्यक पोषक तत्व मिळतात.

Image Source: pinterest

हिवाळ्यात गाजर-बिटाचा ज्यूस प्यायल्यानं अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Image Source: pinterest

गाजर आणि बिटामध्ये मुबलक प्रमाणात आयर्न असतं.

Image Source: pinterest

आयर्नचा उत्तम स्त्रोत

त्यासोबतच गाजर आणि बिटामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी आणि सी असतं.

Image Source: pinterest

त्वचा तजेलदार बनवण्यासाठी

हिवाळ्यात गाजर आणि बिटाच्या ज्यूसचं सेवन केल्यानं त्वचा चमकदार आणि तजेलदार होते.

Image Source: pinterest

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी

हिवाळ्यात अनेक आजार डोकं वर काढतात, अशावेळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजर आणि बिटाचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं.

Image Source: pinterest

रक्ताची कमतरता

अनोशापोटी गाजर, बिटाचा ज्यूस प्यायल्यानं रक्ताची कमतरता दूर होते.

Image Source: pinterest

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

गाजर आणि बिटाच्या ज्यूसमध्ये फायबर आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे वजन वाढू देत नाहीत. ज्यूसचं सेवन केल्यामुळे बराच काळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून वाचू शकता.

Image Source: pinterest

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी

हिवाळ्यात ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी गाजर आणि बिटाचा ज्यूस फायदेशीर ठरतो.

Image Source: pinterest

बद्धकोष्ठच्या समस्येवर रामबाण उपाय

गाजर बिटाच्या ज्यूसमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं, जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे बद्धकोष्ठची समस्या दूर होते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest