वेलचीमध्ये कॅल्शियम, आहारातील फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात, हे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्या. यामध्ये आढळणारे फायबर चयापचय क्रियाही वाढवते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज वेलचीचे पाणी प्या. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.