व्हिटॅमीन बी12 ची कमी असल्यास, भूक न लागणे एक गंभीर लक्षण असू शकते.
झोपेचा अभाव आणि चिडचिड वाढणे विटामिन बी12 कमी असल्याचे संकेत आहेत.
मानसिक अस्वस्थता व डिप्रेशनची लक्षणे देखील दिसू शकतात.
रेड ब्लड सेल्स कमी झाल्याने शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.
सतत थकलेले वाटणे ही देखील व्हिटॅमीन बी12च्या कमतरतेचे लक्षण आहे.
व्हिटॅमीन बी12 ची योग्य पातळी शरीरातील सर्व अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवते.
शरीर आणि मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी बी12चे योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.