सणासुदीच्या काळात, आपण सर्वजण भरपूर गोड खातो, ज्यामुळे कधीकधी आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो.
विशेषतः, जर तुम्हाला साखरेची पातळी वाढण्याची आणि कमी होण्याची समस्या असेल.
पण काळजी करण्याची गरज नाही. दिवाळीत चमचमीत पदार्थ आणि मिठाई खाऊन पोटाचा त्रास होऊ नये म्हणून या तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
दिवाळीनिमित्त भरपूर गोड खाल्लं तर, शरीर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. दिवसभरात किमान ८ १० ग्लास पाणी प्यावे.
नुसतं पाणी पिण्यापेक्षा आपण त्यात लिंबाचा रस, संत्र्याचा रस, ताक किंवा जलजीरा घालून पिऊ शकता. हे पेय शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासोबतच पचनक्रिया सुधारते.
दिवाळीनंतर किमान आठवडा ते दहा दिवस आपला आहार निरोगी आणि संतुलित ठेवा.
आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यामध्ये पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतील. शिवाय जे सहज पचतील.
फ्राईड किंवा जास्त साखर असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे.
मिठाई आणि फ्राईड पदार्थ खाल्ल्यानंतर व्यायाम करणे गरजेचं आहे.
शिवाय हलके पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. यामुळे पचनक्रियेत अडथळे येणार नाही.
( वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )