एक छोटसं ड्राय फ्रूट सर्व ड्रायफ्रुट्सचा जनक आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. याचे सेवन केल्याने शरीराला मिळणारे फायदे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
टायगर नट्स यालाच वाइल्ड आल्मंड असंही म्हणतात. यामध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात, त्यामुळे हे इतर ड्राय फ्रूट्सच्या तुलनेने अत्यंत लाभदायक मानलं जातं.
टायगर नटमध्ये प्रथिने, अघुलनशील फायबर, अमिनो ॲसिड, लोह, जस्त, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक असतात.
टायगर नटचे सेवन स्नायूंना मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
रोज नाश्त्यात मूठभर टायगर नटचे सेवन केल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, ज्यामुळे चपळता येते.
टायगर नटचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
टायगर नट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, जे पचनासाठी खूप फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.