केसांना तेल लावल्याने केसांना पोषण मिळते, यासोबत आपला थकवाही दूर होतो.
काही लोक केस धुण्याच्या दोन-तीन तास आधी तेल लावतात, तर काही जण रात्री झोपण्यापूर्वी तेल लावतात आणि सकाळी उठून केस धुतात.
रात्रभर केसांना तेल लावल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचते, असा समज आहे.
मात्र, डर्माटोलॉजिस्ट याच्या विरोधात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, केसांना रात्रभर तेल लावल्याने जास्त फायदा होत नाही.
पण, तुमच्या केसांमध्ये फंगस तयार होऊन कोंडा होण्याची समस्या होऊ शकते.
केसांना तेल लावण्याची योग्य वेळ शॉम्पू आधी 30 ते 40 मिनिटे आहे.
केस मुलायम होण्यासाठी केसांना तेल लावणे चांगले आहे.
पण 6-7 तास ते ठेवणं योग्य नाही, यामुळे फक्त कोंडा वाढेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.