फ्रीजमध्ये कच्चे दूध ठेवण्याची चूक करू नका, यामध्ये लपलेल्या विषाणूंमुळे तुम्हाला फ्लू संसर्ग होऊ शकतो.

Image Source: istock

जेव्हा गाई आणि म्हशींना संसर्ग होतो, तेव्हा विषाणू त्यांच्या दुधातही पोहोचतात. दूध नीट उकळले नाही, तर त्यामधील विषाणू जिवंत राहू शकतात.

Image Source: istock

कच्चे दूध फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील विषाणूही जिवंत राहतात, अशी धक्कादायक माहिती अभ्यासात समोर आली आहे.

Image Source: istock

कच्चं दूध रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यातील विषाणू सुमारे 5 दिवस जिवंत राहू शकतात, असं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात उघड झालं आहे.

Image Source: istock

कच्च्या दुधात फ्लूचा विषाणू बराच काळ जिवंत राहतो, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. विशेषत: हिवाळ्यात हा धोका जास्त असतो, असंही या अभ्यासात समोर आलं आहे.

Image Source: istock

कच्च्या दुधात साल्मोनेला, ई. कोलाय, लिस्टेरिया, कॅम्पिलोबॅक्टर यासारखे घातक जंतू असू शकतात. यांच्या संसर्गाने तुम्ही आजारी पडू शकता.

Image Source: istock

कच्चे दूध प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार होऊ शकतात.

Image Source: istock

त्यामुळे दूध नेहमी उकळून प्यावे. याशिवाय फ्रीजमध्ये दूध ठेवण्याआधी ते चांगले उकळावे.

Image Source: istock

दूध झाकून ठेवा, जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टींचा वास आणि विषाणू त्यामध्ये जाणार नाही आणि ते खराब होणार नाही.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock