आजकाल खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेकजण थायरॉईडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

थायरॉईडचे हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम असे दोन प्रकार आहेत.

Image Source: pinterest

थायरॉईडमुळे अनेकांना औषधेही घ्यावी लागतात. आज आम्ही तुम्हाला थायरॉईडवरील घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

Image Source: pinterest

हळदीचं दूध

रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद मिसळून प्यायल्याने थायरॉईडला खूप आराम मिळतो.

Image Source: pinterest

दुधीचा रस

रोज रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने थायरॉईड नियंत्रित राहण्यास मदत होते.

Image Source: pinterest

कोथिंबीर

हिरवी कोथिंबीर बारीक वाटून रोज एक ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने थायरॉइडची समस्या दूर होण्यास मदत होते.

Image Source: pinterest

ज्येष्ठमध

रोज ज्येष्ठमधाचा काढा प्यायल्याने थायरॉईड ग्रंथीची सूज कमी होते.

Image Source: pinterest

आले

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे थायरॉईड समस्या कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: pinterest