यासोबत अनेकांना घसा खवखवणे किंवा घसादुखीची समस्याही होते.
घशाच्या खवखवीवर रामबाण उपाय जाणून घ्या.
घसादुखीमुळे अनेकांचा आवाज बसतो. काही लोकांचा आवाज कर्कश येतो, तर काहींचा आवाजही येत नाही. अशा परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
हिवाळ्यात थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाल्याने तसेल बदलत्या वातावरणातील संक्रमणामुळे घसा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो.
तुमचाही घसा खवखवत असेल किंवा दुखत असेल तर यावर काही सोपे घरगुती उपाय करु शकता, ज्याने तुम्हाला हमखास आराम मिळेल.
घसा खवखवल्यास, प्रथम मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे सुरू करा. याशिवाय मिठाचे पाणी प्यायल्याने ही आराम मिळेल.
घसादुखीवर मध हा रामबाण उपाय आहे. गरम पाण्यात दोन चमचे मध टाकून प्या. फक्त मध बनावट नसेल याची खात्री करा.
घसा खवखवल्यास गरम पाण्यात चिमूटभर हळद मिसळून हे पाणी प्या. यामुळे घशाला आराम मिळेल.
घसा दुखत असेल, खवखव असेल आणि कफ येत नसेल तर लवंग चोखता येते. याशिवाय पाण्यात लवंग टाकून उकळून पाणी प्या.
घसा दुखीवर मसाला चहा हाही उत्तम उपाय आहे. यासाठी आले, काळी मिरी, दालचिनी आणि मीठ टाकून मसाला चहा बनवा. यामुळे तुम्हाला घशाच्या समस्येपासून आराम मिळेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.