यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होईल.
हिवाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक असते.
कोरड्या वातावरणासोबतच धूळ आणि माती यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते.
यामुळे त्वचा कोरडी होऊन पिंपल्स येऊन आणि त्याचे डाग राहण्याची समस्या उद्भवते.
हिवाळ्यात हेल्दी ग्लोईंग स्किनसाठी तुम्ही गरम पाण्याची वाफ घेणे चांगले आहे.
पण, यामध्ये एलोवेरा जेल मिसळून वाफ घेतल्याने हे जास्त फायदेशीर ठरेल.
एलोवेरामध्ये असलेले आर्यवेदिक गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करुन त्वचा चमक आणि मुलायम बनवण्यासाठी मदत करतात.
एलोवेरामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स कोरडी त्वचा आणि मुरुमे यांसारख्या त्वचेचा विविध समस्या दूर करतात.
आठवड्यातून दोन वेळा पाण्यात एलोवेरा जेल मिसळून त्याची वाफ घेतल्याने तुम्हाला ग्लोईंग स्किन मिळेल.
याशिवाय त्वचेवरील काळवंडलेपणा आणि डाग दूर होण्यासही हे उपयुक्त ठरेल
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.