निरोगी आहार व निरोगी जीवनशैलीच्या मदतीने हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.



जेव्हा हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.



हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे महिने किंवा आठवड्याआधी दिसू शकतात.



वेळेस वैद्यकीय मदत घेऊन आवश्यक उपाय केल्यास हृदयविकाराची तीव्रता कमी करता येते.



हृदयावरील दाब वाढल्यामुळे शरीराचे तापमान देखील असामान्यपणे वाढू लागते.



हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दाब, वेदना किंवा छातीत दुखणे ही सामान्य लक्षणे दिसून येतात.



जास्त घाम येण्यास सुरूवात होते व थकवा जाणवू लागतो .



स्त्रियांना मान, हात किंवा पाठीत अचानकपणे तीक्ष्ण वेदना जाणवू शकतात.



हलके डोके किंवा अचानक चक्कर येणे, मळमळ जाणवणे अशी लक्षणे सुद्धा दिसतात.



अशी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांची मदत घेणे महत्वाचे आहे.