जास्त जंक फूड खाल्ल्याने तुमच्या सामान्य आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. नियमितपणे जंक फूड चे सेवन केल्याने वजन वाढण्यासोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे व्यक्तीमध्ये तणाव आणि चिडचिडेपणा देखील वाढू शकतो. जंक फूडमध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे कमी असतात. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखर वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जंक फूडचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. जंक फूडच्या नियमित सेवनामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊ लागते. चेहरा निर्जीव, थकलेला दिसू लागतो आणि त्याची चमकही कमी होऊ लागते. पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात अनहेल्दी जंक फूड आहेत. जंक फूड चे अतिसेवन हे एक प्रकारचे व्यसन आहे.