विविध प्रकारची मोड आलेली कडधान्ये

सकाळचा पोषक नाष्टा हा दिवसभरातील एनर्जीचा आधार असतो. नाश्ता वेळेत केल्यानंतर शरीराला काम करायची ऊर्जा मिळून तर प्रॉब्लेम देखील दूर होतात. नाष्ट्यासाठी मोड आलेली कडधान्ये हा चांगला ऑप्शन आहे. आज आपण बघूयात 7 प्रकारच्या टेस्टी डिशेस.

Image Source: istock

मोड आलेले काळे वाटाणे

यामध्ये आयर्न, फोलेट आणि प्रोटीन असते. जे आपल्या मज्जातंतूंना मजबूत बनवते. हे गरम पाण्यात उकळून त्यामध्ये जीरे आणि लिंबू टाकून खाऊ शकता.

Image Source: istock

मोड आलेली मूग डाळ

ही शरीरासाठी खूप चांगली असते. ही मोड आल्यानंतर आणखी टेस्टी होते, तसेच यामध्ये विटामीन सी, फायबर आणि प्रोटीन असते, जी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

Image Source: istock

मोड आलेले सोयाबीन

फिटनेसची काळजी घेणाऱ्यांसाठी नाश्त्यामध्ये न्यूट्रिशन मिळण्यासाठी हा हाय प्रोटीन पर्याय उत्तम असतो.

Image Source: istock

मोड आलेल्या मूळ्यांच्या बिया

तुम्ही यामध्ये लिंबू आणि मिरची टाकून टेस्टी बनवू शकता. यामुळे आपली पचन क्रिया सुधारते.

Image Source: istock

अल्फाफा स्प्राऊट्स

अल्फाफा किंवा ल्युसर्न हे खायला हल्के आणि कुरकुरीत असतात. अल्फाफा स्प्राऊट्स नियमित खाल्ल्याने त्वचा चांगली होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Image Source: istock

मोड आलेली मसूर डाळ

याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही.

Image Source: istock

मोड आलेले गहू

यामध्ये विटामिन, मिनरल आणि फायबर असते. हे त्वचेसाठी चागले असते आणि शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.