आपली त्वचा सुंदर आणि चमकदार असावी अशी अनेकांची इच्छा असते.
पण अनेकदा ब्लॅक हेड्सची समस्या सतावते.
मुख्यतः नाकावर ब्लॅक हेड्स होतात आणि त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते.
ब्लॅक हेड्सपासून सुटका मिळवून कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी हा घरगुती उपाय करू पाहा.
ब्लॅक हेड्सक्या समस्येवर मध हा उत्तम उपाय आहे. मध त्वचा स्वच्छ करण्यात मदत करते. ब्लॅक हेड्सवर मध लावा. आता 15 ते 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून हे मिश्रण ब्लॅक हेड्सवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा.
टोमॅटोमधील लायकोपिन त्वचेवरील डेड स्किन हटवून, त्वचा साफ करण्यात मदात होइल.
लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे ब्लॅक हेड्स कमी करण्यात प्रभाव आहे. लिंबाचा रस ब्लॅक हेड्स लावून 15 मिनिटांनी धुवून टाका.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.