बदलत्या वातावरणामुळे खोकल्याची समस्या उद्भवत असते.
हवामानातील बदल आजार घेऊन येत असतात.
लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचा धोका अधिक असतो.
काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला खोकल्यापासून आराम देऊ शकतात.
कोमट दुधात, मध मिसळून प्यायल्याने खोकल्याचा त्रास कमी होतो आणि घशाला आराम मिळतो.
ज्येष्ठमध आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्याचे चूर्ण कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने खोकला कमी होतो.
आल्याचा तुकडा चघळल्याने घसा मोकळा होतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो
तुळशीच्या पानांचे काढा बनवून प्यायल्यास घशाला आराम मिळतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.