ताण ही एक नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

आपल्या मनाला जेव्हा काही गोष्टी आव्हानात्मक किंवा धोकादायक वाटतात तेव्हा ताण निर्माण होत असतो.

Image Source: pinterest

काम, वैयक्तिक नाती आणि घरच्या जबाबदाऱ्या तसेच जीवनातील इतर घटनांमुळे ताण येत असतो.

Image Source: pinterest

ताणाची लक्षणे म्हणजे असंतोष, राग, निराशा, चिडचिड, चिंता, गोंधळ आणि एकाग्रतेचा अभाव असतो.

Image Source: pinterest

मेडिटेशन करा

ध्यान करण्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.

Image Source: pinterest

सकारात्मक विचार करा

नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करावा आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहावे.

Image Source: pinterest

मदत घ्या

ताणाची लक्षणे जाणवत असतील, तर कोणाशी तरी बोला. गरज पडल्यास मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या.

Image Source: pinterest

समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढवा

परिस्थिती बदला, समस्या पुन्हा समजून घ्या, पर्याय शोधा, त्यांचे परिणाम विचारात घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या.

Image Source: pinterest

योग्य पद्धतीने ताण हाताळल्यास मनःशांती आणि आरोग्य चांगले राहते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest