यासाठी फक्त वजन राखणं आणि जिमला जाणं पुरेसं नाही.
यासाठी तुम्ही काय खाता, यासोबत कोणते पेय प्यायला हवं, हेही महत्त्वाचं आहे.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ने समृद्ध असलेली काही पेये हाडं मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
जाणून घ्या 'या' ड्रिंक्सबद्दल...
दूध हे कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. त्यात प्रोटीन आणि फॉस्फरसही असतो, जो हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.
जर तुम्ही दूध पीत नसाल, तर सोया मिल्क हा एक उत्तम पर्याय आहे, जो हाडांच्या ताकदीसाठी फायदेशीर ठरतो.
ब्रोकोलीच्या रसामध्ये कॅल्शियम आणि हाडे मजबूत करणारे सर्व आवश्यक घटक असतात. याचे द्रव स्वरूपात सेवन केल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात.
संत्री चवीला उत्तम असण्यासोबतच, त्यात व्हिटॅमिन C चं प्रमाणही भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी ठरतं.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या ग्रीन टीने फक्त ताण कमी होतो असं नाही, तर हाडांसाठीही फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.