डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीत बदल केल्याने हृदयविकार टाळता येतो.
ह्रदयविकाराच्या घटना टाळण्यासाठी काय करावे, ते जाणून घ्या.
लाइफस्टाईलमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य खाण्याच्या सवयी.
शक्य तितकी हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
संतुलित आहार घ्या. तेलकट अन्न कमी करा.
फास्ट फूड, पॅकबंद अन्न खाणे टाळा.
या पदार्थांच्या सेवनाने रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते.
रोज योगा किंवा व्यायाम करा.
छातीत दुखणे, अति थकवा किंवा इतर कोणतीही लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी रक्त तपासणी करून घ्या.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.