पेरु

थंडीच्या मोसमात बाजारात पेरु दाखल होतात. पेरु अत्यंत आरोग्यादायी फळ आहे.

Image Source: istock

सफरचंदाऐवजी उत्तम पर्याय

अनेक वेळा डॉक्टर दिवसातून एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. पण, सफरचंद अनेकांना परवडत नसल्याने त्याऐवजी पेरु हा स्वस्त आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

Image Source: istock

पोषकतत्वांनी समृद्ध

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात.

Image Source: istock

सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत

यातील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि शरीरातील ॲलर्जीशी लढण्यासाठी खूप मदत करतात. पेरूचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीशी लढण्यास देखील मदत होते.

Image Source: istock

पोट साफ हेते

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी पेरू खूप फायदेशीर आहे. पेरूचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळतेच पण पचनक्रियाही मजबूत होते. यासोबतच पोट साफ करण्यात पेरू महत्त्वाची भूमिका बजावते.

Image Source: istock

पचनक्रिया सुधारते

पेरूमध्ये असलेले पोषक घटक पचनसंस्था मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. पेरू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. याच्या सततच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Image Source: istock

दृष्टी सुधारते

पेरू खाल्ल्याने दृष्टी सुधारते. जर एखाद्याला डोळ्यासंबंधित समस्या असेल तर तो सतत पेरूचे सेवन करू शकतो. पेरूचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असल्याने ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

Image Source: istock

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उत्तम

डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू अत्यंत फायदेशीर आहे, पेरूमध्ये सफरचंद, केळी आणि संत्र्यापेक्षा कमी साखर असते.

Image Source: istock

पेरुची पानेही फायदेशीर

डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरूच्या पानात उपाय दडलेला आहे. पेरूची पाने खाल्ल्याने साखर नियंत्रणात ठेवता येते.

Image Source: istock

पेरूमध्ये इंसुलिन रेझिस्टन्स नष्ट करणारे गुणधर्म आहेत, जे रक्तातील साखर नियंत्रित करते.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock