तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
तुपात तळलेल्या लसणामुळे पचनतंत्र मजबूत होते.
बध्दकोष्ठता, गॅस, आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
तुपात तळलेला लसूण रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो.
सांधेदुखीची समस्या कमी करण्यासाठी यातील अँटी-इन्फ्लिमेटरी गुण उपयुक्त ठरतात.
यामुळे चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लसूण तुपात तळून खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि त्वचेला चमक येते.
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
तुपात तळलेला लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.