फ्रिजमध्ये भात उघडा ठेवल्यास भाताला चिकट आणि ओलसरपणा येतो तसेच त्याची चवही बिघडते.
शक्य असल्यास एअरटाइट डब्बा वापरावा.
एअरटाइट डब्बा वापरल्याने बुरशी, चिकटपणा, किंवा वास येत नाही.
भाताची चव टिकवण्यासाठी फ्रिजचे तापमान 4 ते 5°C पेक्षा कमी ठेवावे.
भात थंड झाल्यानंतर त्याला एअरटाइट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा.
4 ते 5 दिवस फ्रिजमध्ये भात सुरक्षित राहतो.
जास्त दिवसांपर्यंत साठवलेला भात खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन होऊ शकते.
फ्रिजमधून भात बाहेर काढल्यानंतर भात पूर्ण गरम होईल याची काळजी घ्यावी.
त्याअगोदर भात थोडा वेळ बाहेर ठेवावा आणि नंतर गरम करावा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.