सावधान! लठ्ठपणा भारतीयांसाठी ठरतेय गंभीर समस्या लठ्ठपणा भारतीयांसाठी गंभीर समस्या बनताना दिसत आहे. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2024 नुसार, 2035 पर्यंत भारतातीत 25 टक्के वयस्करांमध्ये लठ्ठपणाची समस्या असेल. व्यस्त लाईफस्टाईल आणि तब्येतीकडे होत असलेले दुर्लक्ष यामागची महत्त्वाची कारणं आहेत. बहुतेक लोक ऑफिसच्या कामामध्ये स्वत:ला वेळ देण्यात अपयशी ठरतात, तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. गृहिणी महिला घरातील इतरांच्या गरजा आणि आवडी-निवडी सांभाळताना स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. यामागे शरीराची कमी हालचाल, व्यायामाची कमतरता, चुकीचा आहार, अपुरी झोप अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे लठ्ठपणाच्या समस्येला गंभीर प्रकारने घेत यापासून सुटका करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.