शरीरातील रक्त वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी डाळिंबाचं सेवन केलं जातं.
आरोग्यदायी अशा डाळिंबाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला अगदी डॉक्टर्सही देतात.
आपण सर्वचजण डाळिंबाचे दाणे खातो आणि त्याची साली फेकून देतो.
पण, तुम्हाला माहितीय का? डाळिंबाच्या दाण्यांपेक्षा त्याच्या सालीत जास्त ताकद असते.
पाणी गरम करुन त्यात डाळिंबाच्या दाण्यांची पावडर मिक्स करून प्यायल्यानं सर्दी-खोकला दूर होतो
डाळिंबाच्या सालींमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात
चेहऱ्यावरी वाढत्या वयाच्या खुणा दूर करण्यासाठी डाळिंबाच्या सालीची पावडर मदत करते. गुलाब पाण्यात मिक्स करुन लावल्यानं चेहऱ्यावरची मुरमं, डाग दूर होतात.
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये पॉटॅशियम असतं, यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
डाळिंबाच्या सालींच्या पावडरचं सेवन केल्यानं शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
डाळिंबाच्या सालींची पावडर पचनक्रिया सुरळीत राहण्यासही फायदेशीर ठरते
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.