लिंबू आणि काही मसाल्यापासून बनवलेला लेमन टी तुम्हाला निरोगी तर ठेवेलच पण भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवेल.
एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) नुसार, लेमन टीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, जो आपल्याला संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करतो.
याशिवाय, श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त मानले जाते.
लेमन टीमुळे ह्रदयरोग आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते.
लेमन टीचे सेवन केल्याने घसा खवखवणे आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.
एनसीबीआयच्या वैद्यकीय संशोधनानुसार, लिंबूमध्ये शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचा गुणधर्म आहे. यामध्ये कमी-कॅलरी असल्यामुळे, हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.
जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबाचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
लिंबू चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.