मुतखडा प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, जाणून घ्या.

किडनी स्टोन टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, जे केल्याने किडनी स्टोनची समस्या टाळता येते.

मुतखड्याची लक्षणे दिसुन येत नाहीत, पण जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात.

किडनी स्टोन चार प्रकारचे असतात. पण त्यामध्ये सुमारे 80 टक्के कॅल्शियम ऑक्सलेटचे दगड असतात. तर स्ट्रुवाइट, यूरिक ऍसिड आणि सिस्टीन हे इतर तीन प्रकार आहेत.

मुतखड्यामुळे तीव्र वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते. काही घरगुती उपचार किडनी स्टोन प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.

किडनी स्टोन टाळण्यासाठी दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या.

आहारात समतोल राखा आणि जास्त मीठ, चरबी, साखर टाळा.


मिठाशिवाय टोमॅटो, पालक, चवळी, कोबी, वांगे, मांसाहारी पदार्थ, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी या पदार्थांचे सेवन कमी करा.


नारळ पाणी, लिंबू सरबत, काकडी, गाजर, अन्य भाज्या, केळी, अननस, पपई आणि इतर फायबरयुक्त पदार्थ मुतखडा टाळण्यासाठी उपयुक्त असतात.

जास्त वजन वाढल्याने किडनी स्टोन बनण्याची शक्यता वाढते. त्याचे वजन नियंत्रित ठेवा.

तुम्हाला याआधीही किडनी स्टोन झाला असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या.


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.