आजकाल मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
मात्र, त्याचा अतिरेक हा शरीर आणि मनावर वाईट परिणाम करू शकतो.
इथे जाणून घेऊया मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम...
मोबाईलचा सतत वापर झोपेवर परिणाम करतो. रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्यानं झोपेची गुणवत्ता खालावते, ज्यामुळे नैराश्य वाढू शकतं.
फोन पाहण्यासाठी अनेक वेळा डोकं खाली झुकवावं लागतं. यामुळे मानेतील स्नायूंवर ताण येतो आणि खांद्यांमध्ये वेदना वाढतात.
मोबाईल वापरताना चुकीच्या पद्धतीनं बसल्यामुळे मनक्यावर ताण येतो. यामुळे दीर्घकालीन पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
सतत टायपिंग करणं आणि स्क्रीन स्क्रोल करणं, यामुळे बोटांमधील स्नायूंवर खूप ताण येतो. हातांमध्ये सुज येते किंवा वेदना जाणवू शकतात.
मोबाईल स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे डोळ्यांमध्ये ताण येतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, धूसर दिसणं, आणि डोकेदुखी होऊ शकतं.
फोनच्या स्क्रीनकडे सतत बघणं आणि चुकीच्या पोझिशनमध्ये बसणं यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो.
मोबाईल हातात धरून लांब वेळ बोलल्यानं किंवा सतत स्क्रीनवर काम केल्यानं मनगटातील स्नायूंवर ताण येतो. यामुळे वेदना आणि इतर समस्या होऊ शकतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.