प्रत्येक गाठ कर्करोगाची सुरुवात नसते. पण त्याचं योग्यवेळी निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे.
शरीरातील गाठी हळूहळू तयार होतात, विशेषतः जेव्हा मेटाबॉलिजम कमी होते.
काही गाठी निरुपद्रवी असतात, म्हणजे त्यांचा काही त्रास नसतो. तर काही गाठी गंभीर आजारांमध्ये बदलू शकतात.
त्वचेवर तयार होणारी सर्वसामान्य गाठ ही मुख्यतः मान, खांदे, हात, कंबर आणि पोटा या भागात दिसते.
मधुमेह, कौटुंबिक इतिहास, मेटाबॉलिक समस्या, वाढलेले कोलेस्ट्रॉल ही गाठींची प्रमुख कारणे आहेत.
गाठींच्या निदानासाठी एक्स-रे, एमआरआय चाचण्या कराव्या लागतात.
मऊ उतींमध्ये तयार झालेल्या गाठी शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंड चाचणीचा वापर होतो.
किडनी, फुफ्फुस, पोटामध्ये किंवा शरीराच्या इतर कोणत्याही अवयवावर गाठी असल्यास वेळीच वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते.
संतुलित आहार, व्यायामने मेटाबॉलिजम सुधारल्यास गाठींची समस्या दूर करता येते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.