आरोग्याच्या अनेक समस्यांवर दालचिनी रामबाण उपाय ठरतो.
दालचिनीच्या पाण्याचं नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक जबरदस्त फायदे होतात.
दालचिनीचं पाणी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतं.
दालचिनीचं पाणी मेटाबॉलिजम वाढवतं, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
दालचिनी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.
अपचन, गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी दालचिनीचं पाणी उपयुक्त ठरतं.
दालचिनीत असलेले अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
चेहऱ्यावरील मुरुमं, डाग कमी होतात आणि त्वचा तेजस्वी होते.
पण, दालचिनीच्या पाण्याचं सेवन कसं कराल?
एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात काही दालचिनीच्या काड्या टाका.
पाणी उकळू द्या आणि 5-7 मिनिटं मंद आचेवर ठेवा.
थोढं थंड झाल्यावर, म्हणजेच कोमट असताना हे पाणी प्या.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.