पण, असं का होतं? याचा विचार कधी केलाय का तुम्ही?
हिवाळ्याच्या मोसमात एखाद्याला स्पर्श केल्यावर चटकन झटका लागतो आणि चट्ट असा आवाज येतो .
आपल्यासोबत अनेकदा असं होतं. पण का होतं? कारण जाणून घेऊयात...
जेव्हा शरीरात किंवा वस्तूमध्ये इलेक्ट्रॉल जमा होत असतात, तेव्हा स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी तयार होते.
हिवाळ्यात आपण सिंथेटिक कपडे जास्त वापरतो.
सिंथेटिक कपड्यामधील फायबरमुळे जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन जमा होतात.
विजेचा झटका किंवा शॉक लागण्यामागचं कारण म्हणजे, हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी, निस्तेज होते... त्यामुळे इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात एकत्र येतात.
हिवाळामध्ये जेव्हा आपण कुणालाही स्पर्श करतो किंवा हात मिळवतो, त्यावेळी आपल्याला विजेचा झटका लागल्यासारखं वाटतं.
जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर, स्किन मॉयश्चरायझ ठेवा, यामुळे तुमच्या कपड्यांवर, त्वचेवर इलेक्ट्रॉन जमा होणार नाहीत.
शक्य असल्यास हिवाळ्यात सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे घाला, यामुळं इलेक्ट्रॉन जमा होण्याचं प्रमाण फारच कमी असतं.