केळी पोटॅशियम आणि मॅग्नेशियममध्ये समृद्ध असतात. दुधासोबत याचे सेवन केल्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होऊन निद्रानाशाची समस्या दूर होते.
हळदीचं दूधाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स युक्त आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने हळद अनिद्रा दूर करण्यात प्रभावी आहे.
लॅव्हेंडर अनेकदा अरोमाथेरपी किंवा चहामध्ये वापरले जाते. यामुळे शांतता मिळते. दुधासोबत लॅव्हेंडरचे सेवन केल्याने मेंदूतील विचार शांत होऊन लवकर झोप येण्यास मदत होते.
अनेक जण अलिकडे चहा आणि कॉफीला पर्याय म्हणून माचा टी पितात. माचा दुधासोबत सेवन केल्याने यातील एल-थेनिन हे कंपाऊंड शरीरातील डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढवते, त्यामुळे आरामशीर झोप लागते.
स्ट्रॉबेरीमधील अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि आवश्यक जीवनसत्त्वे आरामदायक झोपे येण्यासाठी मदत करतात.
चेरीमध्ये मेलाटोनिन असते आणि झोपण्यापूर्वी चेरी मिल्क प्यायल्याने निद्रानाश दूर होईल. यातील मेलाटोनिन आणि ट्रिप्टोफॅनमुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते. यामुळे लोकांच्या झोपेची गुणवत्ता वाढू शकते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.