याची लक्षणे ओळखून योग्य वेळी घरगुती उपाय केल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.
किडनी स्टोनसाठी घरगुती उपाय
दिवसातून 2-3 लिटर पाणी प्यायल्याने किडनी स्टोन लघवीद्वारे बाहेर जाण्यास मदत होते.
ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. 4 ग्रॅम गोखरू पावडरमध्ये 1 चमचा मध घालून दिवसातून तीन वेळा घ्या.
पानफुटी वनस्पतीचं दोन ते तीन पाने दररोज चावून खा किंवा याचा रस काढूनही तुम्ही त्याचं सेवन करु शकता.
रोज सकाळी आणि संध्याकाळी एक-एक चमचा आवळा पावडरचे सेवन करा.
आहारात नैसर्गिक प्रथिनांचा समावेश करा.
कमी मीठाचा आहार घेणे.
तसेच टोमॅटो आणि पालक याचे सेवन शक्यतो टाळा.
या घरगुती उपायांद्वारे तुम्ही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.