हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी तुलसी पाणी उपयुक्त आहे.
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी रोज तुलसी पाणी प्या.
तुलसी पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
रोज सकाळी तुलसी पाणी प्यायल्याने मन शांत राहते आणि ताण कमी होतो.
अनोशेपोटी तुळशीचं पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी करण्यात मदत होईल.
तुळशीचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
तुलशीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे A, C, K असतात.
तसेच मँगनीज, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
उकळत्या पाण्यात तुळशीची काही ताजी पाने घाला आणि 5-7 मिनिटे उकळू द्या.
नंतर हे पाणी गाळून कोमट असताना प्या.
उत्तम परिणामांसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिण्याची सवय लावा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.