अमेरिकेत झालेल्या एका खटल्याच्या तपासात कंडोममध्ये PFAS नावाचे कार्सिनोजेनिक केमिकल्स आढळले आहेत.
PFAS एक केमिकल आहे, ज्यामुळे कॅन्सर, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती आणि न्यूरोलॉजिकल आजार उद्भवतात.
काही कंडोम्स आणि त्यांच्या ल्युब्रिकंट्समध्ये याचा वापर स्मूदनेस आणि स्टेन रेजिस्टेंससाठी केला जातो.
एका रिसर्चमध्ये 29 कंडोमचे सॅम्पल्स तपासण्यात आले. त्यात असं आढळून आलं की, 14 टक्के कंडोम्समध्ये PFAS आहे.
PFAS च्या वापरामुळे कॅन्सरसोबतच हार्मोनल इम्बॅलन्सची समस्याही उद्भवते. यामुळे सेक्शुअल हेल्थवरही परिणाम होतो.
यासंदर्भातील रिसर्चनंतर PFAS चा वापर करण्यात आलेले कंडोम बाजारातून हटवण्याची मागणी वाढली आहे.
कंडोमच्या ल्युब्रिकंट्समध्येही PFAS आढळून आलं, ज्यामुळे अॅलर्जीचा धोका संभवतो.
केमिकल फ्री असलेले कंडोमचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
कंडोमचा वापर केल्यानंतर जर तुम्हाला जळजळ, अॅलर्जी किंवा रॅशेज आले तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)