जसा वेळेला चहा हवाच, तशी अनेकांना वेळेला कॉफी लागते.
अनेकांचा तर कॉफीशिवाय दिवसच उजाडत नाही.
वेट लॉस जर्नी असो वा दिवसाची सुरुवात कॉफी अनेकांना प्रिय असते.
एका ठराविक मर्यादेत कॉफिचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
पण, जर ती मर्यादा ओलांडली तर कॉफीमुळे नुकसानही तेवढंच होतं.
तुम्ही कधी विचार केलाय का? आवडीनं प्यायल्या जाणाऱ्या कॉफीचे किती कप दररोज प्यायले जातात?
जगभरात दररोज सुमारे 2.25 अब्ज कप कॉफीचं सेवन केलं जातं.
तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात 400 मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॉफीचे सेवन टाळायचं असतं.
गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, लहान मुलं आणि तरूण मुलांनी कॉफी टाळावी.
अनोशापोटी कॉफी पिणं अपायकारक ठरतं.
रात्री झोपण्यापूर्वी कॉफी घेतल्यास निद्रानाश होऊ शकतो.
झोपायच्या आधी 3-4 तास कॉफी पिणं टाळा, म्हणजे झोप चांगली लागेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.